अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या माध्यमातून भारताच्या विविध प्रांतातील इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन करण्याची संकल्पना अंमलात आणली जाते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र संघटन तयार करण्यात आले, आणि त्याला इतिहास संकलन समिती असे संबोधन देण्यात आले. कोल्हापूरच्या इतिहासाचा व्यापक अभ्यास करण्यासाठी इतिहास संकलन समिती कोल्हापूरची स्थापना दिनांक २३ डिसेंबर २००८ रोजी मा. हरिभाऊ वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.